Raj Thackeray : शरद पवार नास्तिक आहेत, ते देवधर्म पाळत नाहीत; मी बोलल्यानंतर मंदिरात जातायत : राज ठाकरे

Raj Thackeray on Sharad Pawar : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार नास्तिक आहेत, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले आहेत.

Raj Thackeray on Sharad Pawar, मुंबई : “शरद पवार नास्तिक आहेत, ते देवधर्म पळत नाही. त्यांच्या मुलीने देखील सांगितलं आहे. मी बोलल्यावर ते प्रत्येक मंदिरात जायला लागले. त्यांचं हात जोडणे देखील खोटे आहे”, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. राज ठाकरे यांच्या मनसेचा मुंबईत राज्यस्तरीय पदाधिकारी मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते.

समुद्रात महाराजांचा पुतळा उभारण्यापेक्षा हेच हजारो कोटी गड किल्ल्यांवर खर्च करा

राज ठाकरे म्हणाले, माझ्या महाराष्ट्रात उद्योग कसे येतील, हे पाहात नाहीत. काम कसे येईल हे नाही तर फुकट पैसे वाटत सुटले आहेत. समुद्रात महाराजांचा पुतळा उभारायचा, काही वर्ष आधी विनायक मेटे यांनी तो विषय घेतला. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा उंच पुतळा उभारायचा. मला शिल्पकला माहित आहे, म्हणून बोलतो, तो घोडा किती उंच असेल? वल्लभभाई पटेल यांचा पुतळा चायनामधून बनवून आणला आहे. जर महाराजांचा पुतळा उभारायचा असेल तर समुद्रात भर किती टाकावी लागेल? सिंधुदुर्गात तो पुतळा पडला. उद्या तुम्ही टाकलेला भराव पडला आणि पुतळा पडला तर? समुद्रात शिव छत्रपतींचा पुतळा उभारण्यापेक्षा हेच हजारो कोटी गड किल्ल्यांवर खर्च केले तर भविष्यात सांगता येईल की आमचा राजा कोण होता. औरंगजेबाला त्याची लायकी दाखवली,आमच्या राजाने त्या मोठ्या राजाला इथे आणला. 6 बाय 4 फुटत गाडला. खोटं सांगायचं, काहीही सांगायचं,असंही राज ठाकरे यांनी नमूद केलं.

मला महाराष्ट्र देऊन बघा मग महाराष्ट्र कधीही दिल्ली पुढे झुकणार नाही

एक महाराष्ट्राची भाषा, हे प्रवक्ते काय बोलतात, घाणेरडे सर्वांना बोलता येते पण कुठे बोलायचे? मला भीती हीच वाटते लहान लहान मुलांना वाटेल हेच राजकारण असते, उद्या ते म्हणायला लागतील. ही दिशा नाही ही दशा आहे. उद्या जेव्हा हे राजकीय पक्ष पैसे वाटतील तेव्हा ते नक्की घ्या. कारण तुमचे पैसे आहेत, आणि मतदान मनसेच्या उमेदवाराला करा. एकदा मला महाराष्ट्र देऊन बघा मग महाराष्ट्र कधीही दिल्ली पुढे झुकणार नाही. अदानी तुमचे विमानतळ घेतो, पोर्ट घेतो, कोकणातील एक जमीन घेत आहेत. गुजरातमध्ये शेतकऱ्याला जमीन शेतकऱ्याला विकावी लागते. महाराष्ट्रात खून होत आहेत, बलात्कार होत आहेत, आकडेवारी सांगतो, असंही राज ठाकरे म्हणाले.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Baba Siddiqui Murder : बाबा सिद्दीकींच्या निर्घृण हत्येनंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याच्या बंगल्यावर सुरक्षा वाढवली

ही तीन माणसं मला संशयास्पद वाटतात", अजित पवारांच्या बंडखोरीवर राज ठाकरेंचं  मोठं विधान | raj thackeray reaction on ajit pawar rebellion sharad pawar ncp

बारामतीतही त्यांनी जिर्णोद्धार केलेली अनेक मंदिरं आहेत. आमच्या सर्व निवडणुकांचा प्रचार कन्हेरीतून होतो. 1967 पासून आम्ही परंपरा जपली आहे. बऱ्याचदा त्यांची पावलं या मंदिराकडे वळल्याचं आम्ही पाहत आलोय.

वेळ असेल तेव्हा मंदिरात दर्शनासाठी जातात. असं असताना त्यांना आस्तिक म्हणायचं की नास्तिक हे आपल्याला ठरवावं लागेल.

एखाद्यानं भगवं वस्त्र परिधान केलं किंवा भगवा गंध लावला, धार्मिक वस्त्र परिधान केले म्हणजेच आस्तिक होतो असं मला वाटत नाही अशा शब्दात राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे.

शरद पवार यांनीही राज ठाकरे यांच्या टीकेला उत्तर दिले आहे. ते म्हणाले, माझा धर्म आणि देव याचं मी प्रदर्शन करत नाही. मी निवडणुकीत देवधर्म आणत नाही. मी एकाच मंदिरात जातो. बारामतीत. त्याचा मी गाजावाजा करत नाही.

माझ्यापुढे काही आदर्श आहेत. प्रबोधनकार ठाकरे हे माझे आदर्श आहेत. त्याचं लिखाण वाचलं तर त्याचं सविस्तर मार्गदर्शन होईल. देव धर्माच्या नावाने बाजार मांडणाऱ्या प्रवृत्तींवर प्रबोधनकारांनी टीका केली.

गैरफायदा घेणाऱ्या घटकाला ठोकून काढण्याचां काम प्रबोधनकारांनी केलं. आम्ही प्रबोधनकारांचं लिखाण वाचतो. कुटुंबातील लोकं वाचत असतील असं नसाव. त्यामुळे त्यावर अधिक बोलण्याची गरज नाही अशा शब्दात शरद पवार यांनी राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे.

Exit mobile version